उत्राण शिवारातील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा ; ५ जुगाऱ्यांना अटक

उत्राण शिवारातील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा ; ५ जुगाऱ्यांना अटक
६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; कासोदा पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी)– कासोदा पोलिसांनी गावालगतच्या उत्राण शिवारातील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे. या कारवाईत एकूण ६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सपोनि निलेश राजपूत यांना शंकर रामदास चौधरी यांच्या शेतात काही इसम पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथक रवाना केले. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पथकाने छापा टाकत जमिनीवर बसून पत्त्यांचा खेळ खेळत असलेल्या इसमांना पकडले.
पकडलेल्यांमध्ये रामचंद्र दगडु कोळी (३०), हेमंत राजू भोई (२५), नारायण सुरेश चौधरी (३३), गोरख धर्मा गोकुळ (४०) यांचा समावेश असून उत्तम धनराळे हा फरार झाला आहे. सर्वजण उत्राण (ता. एरंडोल) येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून ५९५० रुपये रोख, १० हजार रुपयांचा मोबाईल आणि ४५ हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोको दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील व दीपक देसले यांचा समावेश होता.






