क्रिकेट स्पर्धांमध्ये इलेक्ट्रिशन थंडर विजेते ; इलेक्ट्रिशन इंडियन उपविजेता

क्रिकेट स्पर्धांमध्ये इलेक्ट्रिशन थंडर विजेते ; इलेक्ट्रिशन इंडियन उपविजेता
स्मार्ट इलेक्ट्रिशन व कॉन्टॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थातर्फे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
स्मार्ट इलेक्ट्रिशन व कॉन्टॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था जळगाव महाराष्ट्र राज्य संस्थेमार्फत आयोजित 13 14 15 फेब्रुवारी रोजी भव्य जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ धरणगाव पाचोरा चाळीसगाव त्यानंतर जामनेर तालुक्यातील तसेच एरंडोल चोपडा या ठिकाणावरून इलेक्ट्रिशन कॉन्टॅक्टर लोकांनी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला होता.
तसेच प्रथम क्रमांक इलेक्ट्रिशन थंडर आणि द्वितीय क्रमांक चे बक्षीस इलेक्ट्रिशन इंडियन यांनी पटकावला आणि धरणगाव टीमने तृतीय क्रमांक पटकावला या तीन दिवसीय सामन्यांमध्ये जळगाव व बाहेरगावावरून इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टरयांची उपस्थिती होती. शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हातून क्रिकेटची ओपनिंग करण्यात आले. तसेच शिवम इंटरपाईजेचे संचालक मुकेश सोनवणे यांच्या हातून भारतमातेच्या फोटोला फुल पुष्पहार घालून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात फुलांची पुष्प माळा घालून व नारळ फोडून कार्यक्रमाला तसेच क्रिकेट खेळायला सुरुवात करण्यात आली .
आयोजक समितीमध्ये अध्यक्ष कल्पेशसोमानी उपाध्यक्ष प्रदीप नाना पाटील तसेच संस्था सचिव कल्पेश प्रवीण खैरनार व सदस्य पदामध्ये जहांगीर शहा गुड्डू भाई शहा विनायक अत्तरदे ,रामभाऊ जेऊरकर ,रवींद्र प्रताप पाटील शरद लक्ष्मण पाटील ,रवींद्र नारायण आगळे ,रोशन मणियार तसेच या कार्यक्रमांमध्ये इलेक्ट्रिशन यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला .