गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
भडगाव तहसीलदारांची कारवाई
भडगाव प्रतिनिधी l तालुक्यातील गिरणा नदीपात्रांमधून अवैधरित्या वाळूचा उपसा होत असून आज भडगाव तहसील च्या कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील वाक येथून गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले असून मात्र रात्री करण्यात आलेल्या गस्तीदरम्यान अवैध वाळूचे भरलेले डंपर घेऊन चालक पसार झाला.
या कारवाई बद्दल बोलताना ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी दंडात्मक कारवाई करण्यात येऊन ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील महादू कोळी, गितेश महाजन, प्रशांत कुंभारे, एम जे खाटीक, अभिमन्यू वारे आदींनी केली.
यावेळी पथक हे खाजगी गाडीत रात्री गस्तीवर असताना भडगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपरचा पाठलाग करत होते. परंतु ते त्या डंपरला थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला परंतु त्यावरील चालक हा रस्त्याची व वाहतुकीची परवा न करता सुसाट पारोळ्याच्या दिशेने अवैध वाळू वाहतुकीचे डंपर घेऊन फरार झाला. हे डंपर पळाले जरी असले तरी त्यावर येत्या काही दिवसात कारवाई नक्की होणार आहे.
तसेच गिरणा नदी पत्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असे, यावेळी महसूल विभागांना माहिती देण्यात आली.