आदर्श सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

महा पोलीस न्यूज । दि.३ सप्टेंबर २०२४ । रावेर तालुक्यातील कर्जोद येथे मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे साहित्यिक व सामाजिक तसेच शिक्षक,कवी,व विविध क्षेत्रातील बंधू-भगिनीना ‘मौलाना अबुल कलम आजाद आदर्श सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून या आदर्श सम्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मौलाना अबुल कलम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय कर्जोद ता.रावेर तर्फे आयोजित या पुरस्काराचे हे १३ वे वर्ष असून हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे. आपल्या शैक्षणिक, साहित्यिक, कवी, शेतकरी, सामाजिक विविध क्षेत्रातील कार्याचा प्रस्ताव दि.२० सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवायचे आहे. राज्यातील सर्व शिक्षक, साहित्यिक, कवी, विविध कर्मचारी आदी बंधू-भगिनीनी आपल्या कार्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
पुरस्काराचे स्वरुप आकर्षक स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, पेन असे असून रावेर-यावल तालुक्याचे आमदार व जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. प्रस्ताव एका प्रतीत व दोन रंगीत छायाचित्रासह मौलाना अबुल कलम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद, ता.रावेर, जि. जळगाव या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष शकील अब्दुल शेख 9823336417, रईस अलाउद्दीन शेख (केंद्रप्रमुख) 9890560163, आशिष पाठक 9823987215, शहजाद अन्वर आकोलवी(अकोला) 9422160220, मोहसीन सर (जळगाव) 9271444786, हाजी सरफराज शेख 8668970643 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.