जुन्या वादातून तरुणावर लोखंडी पट्टीने हल्ला

जुन्या वादातून तरुणावर लोखंडी पट्टीने हल्ला
जळगाव : जुन्या वादातून रागाच्या भरात तरुणावर लोखंडी पट्टीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पिंप्राळा हुडको परिसरात घडली. ३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबू शेख साबीर (वय २२, रा. पिंप्राळा हुडको) हा युवक परिसरात आपल्या मित्रांसोबत थांबलेला असताना, पूर्वीच्या वादातून काही व्यक्तींनी त्याच्याशी वाद घालून अचानक त्याच्या मानेवर लोखंडी पट्टीने जोरदार वार केला. या हल्ल्यात बाबू शेख गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. बाबू शेख याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.