Crime

दारूची बाटली न दिल्याच्या कारणावरून संतप्त टोळक्याचा हैदोस ! 

दारूची बाटली न दिल्याच्या कारणावरून संतप्त टोळक्याचा हैदोस ! 

हॉटेलमधील मॅनेजरला शिवीगाळ करत सामानाची तोडफोड ; साकेगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील साकेगाव येथील वरुण हॉटेलमध्ये दारूची बाटली न दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या टोळक्याने हॉटेलमधील मॅनेजरला शिवीगाळ करत, हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली आणि गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना सोमवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी २४ जून रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरुण हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले सुमित सुभाष इंगळे (वय ३३, रा. भुसावळ) यांना दारू न दिल्याचा राग मनात धरून संशयित कुणाल अहिरे, सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी आणि त्यांच्या सोबत आठ ते दहा अनोळखी व्यक्ती सोमवारी रात्री हॉटेलमध्ये आले. या टोळक्याने सुमित इंगळे यांना शिवीगाळ करत धमकावले. त्यानंतर हॉटेलमधील वस्तूंची तोडफोड करत गल्ल्यातील सुमारे २० ते २५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेतली.

याशिवाय, आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज आणि डीव्हीआर मशीनही सोबत घेऊन पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सुमित इंगळे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांसह अनोळखी आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button