Crime

दुग्ध व्यवसायिकाची शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

दुग्ध व्यवसायिकाची शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावात रविवारी (दि. ४ मे) दुपारी एका ३० वर्षीय युवकाने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भरत रतन वाघ असे मृताचे नाव असून, चारा आणण्यासाठी शेतात जात असल्याचे सांगून ते घरातून निघाले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भरत वाघ हे दुग्धव्यवसायात कार्यरत होते. त्यांनी बचत गट आणि पतसंस्थांमार्फत कर्ज घेऊन म्हशी खरेदी केल्या होत्या. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. कर्जाच्या ओझ्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने भरत यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.भरत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने बिलवाडी गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button