देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा
दिल्लीत होणार महायुतीच्या नेत्यांची बैठक, मुख्यमंत्री च्या नावावर होणार शिक्कामोर्तब
मुंबई वृत्तसंस्था – गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावरून खलबते सुरू असली तरी यावर आता पडदा पडला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पसंती दर्शवली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर आमची गुरुवारी दिल्लीत बैठक आहे. या बैठकीत मोदी आणि शहा जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना माझा पाठिंबा आहे, असे पत्रकार परिषदेत जाहीर करत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आपण मंगळवारी रात्री फोनवर चर्चा केली असून, महायुतीचे सरकार स्थापन करण्यात माझा कोणताही अडसर नाही, असे त्यांना आश्वस्त केले आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला आणि शिवसेना पक्षाला मान्य असेल. भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला माझा व पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेली कोंडी शिंदे यांनीय एक पाऊल मागे येत फोडल्याचे मानले जात आहे. मात्र या माधारीच्या बदल्यात शिवसेनेने काही महत्त्वाच्या खात्यांवर दावा सांगत अधिक मंत्री देण्याची मागणी केली आहे.
गेल्या शनिवारी निकालात महायुतीला भरघोस बहुमत मिळाल्यानंतर शिंदे यांना किमान वर्ष किंवा अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती. तशी भूमिका शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे मांडल्यानंतर भाजपची पंचाईत झाली होतीमुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांच्यातही दुरावा आला होता. मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे स्पष्टपणे सांगितले.