Crime

नागेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी

नागेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी

वरणगाव महा  पोलीस न्यूज l दि. २३/०५/२०२५

येथील बोदवड रोडवरील नागेश्वर मंदिरात पुजाऱ्याला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व किल्ल्या हिसकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (२१ मे) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागेश्वर मंदिराचे पुजारी रामेश्वर उखडू भोपळे हे मंदिराच्या रूममध्ये झोपलेले असताना अचानक २० ते २२ वयोगटातील चार ते पाच अनोळखी युवकांनी मंदिरात प्रवेश केला. दरवाजावर लाथ मारून त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडायला लावला.

यानंतर या युवकांपैकी एकाने भोपळे यांना जबरदस्तीने बाहेर उद्यानाजवळ नेले आणि चाकू लावून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मंदिराच्या किल्ल्या हिसकावून घेतल्या. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button