Other

पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

गिरडगाव येथील घटना

 

यावल l प्रतिनिधी तालुक्यातील गिरडगाव शिवारात एका शेतकऱ्याचा विहिरीजवळ काम करताना तोल जाऊन बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव दिलीप उत्तम पाटील (वय ५२, रा. गिरडगाव, ता. यावल) असे आहे.प्राप्त माहितीनुसार, दिलीप पाटील हे आपल्या कुटुंबासह गिरडगावात राहत होते. सोमवार, २६ मे २०२५ रोजी दुपारी ते शेतातील विहिरीजवळ काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. शेजारील शेतात काम करणाऱ्या लोकांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे गिरडगाव परिसरात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दिन शेख करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button