ब्रेकींग : फायरिंग करणारा १२ तासांत गजाआड

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात दि.७ ऑगस्ट रोजी रात्री रामानंद नगर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी फरार झालेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. दिपक लक्ष्मण तरटे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
दोन दिवसापूर्वी राजदीप सपकाळे यांच्या घरात हा प्रकार घडला होता. दिपक तरटेने गावठी कट्ट्यातून फायर केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी आर्म्स अॅक्ट ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासणीच्या आधारे पोलिसांनी रामेश्वर कॉलनी परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली.
दिपक तरटे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात यापूर्वीच चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेका सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, योगेश बारी, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, गोविंदा पाटील यांनी केली आहे.






