Politics

भाजपच्या पूर्व जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर तर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी 

जळगाव महानगर अध्यक्षपदी पुन्हा दीपक सूर्यवंशी यांची वर्णी : भाजपकडून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

जळगाव | महापोलीस न्यूज l १३ मे २०२५

आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यातील संघटनात्मक पातळीवर बदल करत आज नव्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची घोषणा केली. यात जळगाव जिल्ह्याला विशेष महत्त्व देण्यात आले असून, दोन्ही जिल्हाध्यक्षपदांसह महानगराध्यक्षपदावर नव्याने जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केल्याचा अनुभव लक्षात घेता, त्यांना जिल्हा पातळीवर संधी देण्यात आली आहे.

जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. ते माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख राहिले असून, पक्षासाठी सातत्याने कार्यरत राहिल्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, दीपक सूर्यवंशी यांची जळगाव महानगराध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. महानगराध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी केलेल्या प्रभावी कार्यप्रदर्शनावर पक्षनेतृत्वाने विश्वास दर्शवला आहे.

भाजपने सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने दोन मराठा आणि एका गुजर समाजातील कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षपद देऊन विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ही संघटनात्मक फेरबदल महत्त्वाची मानली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button