महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक; ‘एकसंघपणे लढण्याचा निर्धार’
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक; ‘एकसंघपणे लढण्याचा निर्धार’
जळगाव : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी आमदार एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई निवासस्थानी पार पडली. ‘एक वॉर्ड – एक पक्ष चिन्ह’ या सूत्रानुसार निवडणूक लढविण्यात येणार नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आदींनी आगामी निवडणुकीच्या रणनीतीसह विविध विषयांवर आपले विचार मांडले. तसेच अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष डॉ. रिझवान खाटीक, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, दुर्गेश पाटील, रहीम तडवी, किरण राजपूत, गोटू चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत आघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घेत आगामी निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून कार्यकर्त्यांना संघटितपणे तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.






