साहित्य संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन संस्थेचा गौरव .

साहित्य संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन संस्थेचा गौरव .
चाळीसगाव प्रतिनिधी l
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन संस्थेने बंजारा भाषा , साहित्य व संस्कृतीच्या रक्षणार्थ , एप्रिल 2025 मध्ये चाळीसगाव येथे खान्देशस्तरीय बंजारा साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट आयोजन केले होतं . यानिमित्ताने .
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या ११२ व्या जयंती निमित्त वसंतरावजी नाईक अधिकारी, कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य. तालुका शाखा चाळीसगाव यांच्या वतीने
गौरव करण्यात आला .
वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या समाज बांधवांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन ,खान्देश मंगल कार्यालय हिरापूर रोड चाळीसगाव येथे ६ जुलै रोजी करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरत शेठ लालचंद चव्हाण सरपंच लोणजे हे होते .प्रमुख अतिथी म्हणून जामनेर ,येथिल शिक्षण विस्तार अधिकारी पितांबर राठोड , संघटनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र राठोड, सदस्य वासुदेव चव्हाण,ग्राम विकास अधिकारी अनारसिंग राठोड , माजी जि . प .सदस्य सुभाष चव्हाण , माजी . कृउबा सभापती मच्छींद्र राठोड , माजी पं . स . सभापती विजय जाधव ,उद्योजक माधव राठोड , सुभाष जाधव , विनित राठोड
आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय राठोड यांनी केले आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात संघटनेचे उद्देश , कार्य व भावी काळातील वाटचाल या विषयी सांगताना त्यांनी संघटनेतर्फे चाळीसगाव तालुक्यात शासनाच्या माध्यमातून बंजारा समाज बांधवांसाठी ‘सेवा वसंत भवन बांधण्यासाठी ‘ पुढाकार घेण्यात येईल व आगामी काळात बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येईल असे मत व्यक्त केले .
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षांसह दहावी , बारावी ,नीट ,सीईटी आदी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व फोल्डर फाईल सप्रेम भेट देऊन गौरव करण्यात आला .
या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने ‘ ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन या संस्थेने बंजारा भाषा , साहित्य व संस्कृतीच्या रक्षणार्थ एप्रिल 2025 मध्ये चाळीसगाव येथे खान्देशस्तरीय बंजारा साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट आयोजन केलं होतं . यानिमित्ताने संस्थेचा ,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला .संस्थेच्या वतीने अध्यक्ष अशोक राठोड संपादक योगेश्वर राठोड संघटनक रुपसिंग जाधव चित्राताई जाधव आदी कार्यकर्त्यांनी हा सन्मान सिकारला .
भाषा साहित्य व
संस्कृतीच्या रक्षणासाठी या सन्मानाने पाठबळ मिळालं .
समाजात वैचारिक चळवळ गतिमान करण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहू
असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी व्यक्त केला आहे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीव राठोड , मोरसिंग जाधव , विनय राठोड , निलेश राठोड , तुळशीराम पवार , गीता चव्हाण , सविता राठोड , उत्तम चव्हाण , कोमलसिंग जाधव , सुभाष राठोड , कैलास राठोड , हरिचंद्र चव्हाण . ॲड . वाडीलाल चव्हाण , सुरेश चव्हाण , नामदेव राठोड , सुनंदा चव्हाण
सुनिल जाधव , नितिन राठोड ,ताराचंद चव्हाण , कैलास राठोड , सत्तेसिंग राठोड
आदिंनी परिश्रम घेतले .
सूत्रसंचालन श्री सुभाष चव्हाण सर यांनी केले .तर विनय राठोड सर यांनी आभार मानले .