राष्ट्रीय जनमंच पक्षात अमोल पाटील यांची चाळीसगाव तालुका अध्यक्ष, कामगार आघाडीपदी नियुक्ती

राष्ट्रीय जनमंच पक्षात अमोल पाटील यांची चाळीसगाव तालुका अध्यक्ष, कामगार आघाडीपदी नियुक्ती
चाळीसगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या चाळीसगाव तालुकास्तरीय बैठकीत संघटन विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत अमोल पाटील यांची चाळीसगाव तालुका अध्यक्ष, कामगार आघाडीपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणे, सामान्य नागरिकांसाठी संघर्ष करणे तसेच कामगारांच्या हक्कांसाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पक्ष संघटनेचा एक मजबूत भाग म्हणून विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून अमोल पाटील यांच्याकडे कामगार आघाडीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर. वाघ यांच्या हस्ते अमोल पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीनंतर बोलताना अमोल पाटील यांनी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार आणि धोरण घराघरात पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, संघटनात्मक मजबुती वाढवत पक्षविस्तारासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. कामगारांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, प्रदेश प्रभारी संघटक देविदास वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, जळगाव जिल्हाध्यक्ष (वकील आघाडी) ॲड. महेश मोरे, चाळीसगाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






