Other

लोकतंत्र सेनानी संघाच्या मेळाव्यात 324 सेनानींचा सहभाग

लोकतंत्र सेनानी संघाच्या मेळाव्यात 324 सेनानींचा सहभाग

प्रांतस्तरीय मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या आभाराचा ठराव
जळगाव 28 जून l दादर येथील वसंतस्मृती सभागृहात आयोजित लोकतंत्र सेनानी संघाच्या प्रांतस्तरीय मेळाव्यात 324 सेनानींनी सहभाग घेतला. या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचा ठराव मंजूर करण्यात आला.

देशात आणिबाणी लागुन 50 वर्ष पुर्ण झाल्यानिमीत्त राज्यातील सर्व मिसा बंदी झालेल्या लोकतंत्र सेनानी संघाच्या सेनानींचा प्रांत मेळावा मुख्य मार्गदर्शक म्हणुन अखिल भारतीय सचिव कोमल छेडा यांची उपस्थिति होती. संघटनेचे प्रांत अध्यक्ष उमेकर, कार्याध्यक्ष रघुनाथ दिक्षित, महासचिव विश्वास कुलकर्णी, सचिव प्रदिप ओगले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कोमल छेडा उमेकर आणि रघुनाथ दीक्षीत यांच्या मार्गदर्शना नंतर महासचिव विश्वासराव कुळकर्णी यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांच्या शंकांना उत्तरे देवून समाधान केले.

निधीमध्ये दुप्पट वाढ आणि जिल्हास्तरावर झालेल्या मिसाबंदींच्या सत्काराच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या आभाराचा ठराव विश्वास कुळकर्णी यांनी मांडला आणि तो मंजुर करण्यात आला. सुत्रसंचालन प्रदीप ओगले यांनी केले. आभार विश्वास कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाची
सांगता सामुहीक वंदेमातरमने झाली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button