Crime

वन विभागाची सलग दुसऱ्या दिवशी अवैध लाकूड चोरट्यांवर कारवाई

वन विभागाची सलग दुसऱ्या दिवशी अवैध लाकूड चोरट्यांवर कारवाई
४३ हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
रावेर प्रतिनिधी

वनविभागाने मोहीम सुरू केली असून सलग दुसऱ्या दिवशी दि.२७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावने राधेर गांना मिळालेल्या नुसार सावदा ते तांदलवाडी रस्त्याने गरत करीत असताना तांदळवाडी गवाजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप संशयास्पद आढळून आली. त्या वाहनाचा पाठलाग सदर वन टीमने केला. वाहन क्रमांक एम एच ०४ नी एफ-७२६३ या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता  त्यात २५ सागवानी इमारती नगांचा माल आढळून आला .

वाहनचालक युवराज सिताराम तायडे (वय ३५) रा. मांगलवाडी यांना मालाविषयी लागणाऱ्या परवानगीची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले , सागवान इमारती मालाचे मोजमाप रावेर आगार डेपो  येथे वाहन चौकशी दरम्यान घेण्यात आले. मोजमाप १२२१ च. मी. एवढी असून मालाची किंमत ४३ हजार ११६ रुपये असून, ताब्यात घेतलेल्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीची किंमत अंदाज ३ लाख ४५ हजार रुपये आहे. पुढील चौकशी वाहन आगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे.

ही कारवाई ही घुळे वनसंरक्षक निनू सोमराज, उपवन संरक्षक जमीर शेख ,विभागीय वनधिकारी आर. आर. सदगीर तसेच चोपडा सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे, यावल सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, जुनोना वनरक्षक जगदीश जगदाळे, वाहन चालक विनोद पाटील तसेच विशेष पेसा वनरक्षक रावेर रेंज बवऱ्या बारेला कियारसिंग बारेला, आकाश बारेला, निलेश बारेला यांच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button