विकसित भारत चित्रकला व निबंध स्पर्धा उत्साहात

विकसित भारत चित्रकला व निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत विकसित भारत चित्रकला स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व जळगाव शहर महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले सदर चित्रकला व निबंध स्पर्धा शहराती मनपा शाळा क्र.२ चौबे शाळा इथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट चित्रकला सादर केली.
चित्रकला व निबंध स्पर्धे च्या या कार्यक्रमाप्रसंगी महानगर सरचिटणीस राहुल वाघ, सेवा पंधरवडा अभियान संयोजक विजय वानखेडे, चित्रकला व निबंध स्पर्धा संयोजक शिरीषकुमार तायडे, दीपक परदेशी, पितांबर भावसार,उपायुक्त पंकज गोसावी, भूषण लाडवंजारी, मयूर भदाणे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते






