Crime
विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू : तरवाडे येथील घटना
अमळनेर : तालुक्यातील तरवाडे येथील २३ वर्षीय तरुणाचा स्वतःच्या मालकीच्या विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.९ रोजी उघडकीस आली आहे.
तालुक्यातील तरवाडे येथील सुनील निंबा पाटील (वय २३) हा तरुण टीवायबीएचे शिक्षणकरून घरी शेती व्यवसाय करत होता. दि.९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुनील हा स्वतः चा मालकीच्या विहिरीत पडल्याचे समजल्याने गावातील लोकांनी त्याला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सतीश पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.