शहीद दिनाचे औचित्य साधून आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ मुकुंद गोसावी यांनी राबवला अनोखा समाजपयोगी उपक्रम

शहीद दिनाचे औचित्य साधून आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ मुकुंद गोसावी यांनी राबवला अनोखा समाजपयोगी उपक्रम
वृक्षरोपण,रक्तदान,मोफत आरोग्य शिबिर व सत्संगसेवा
जळगाव — शहीद दिनाचे औचित्य साधून आपल्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ अनोखा समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी केला.
सतत सामाजिक तथा राष्ट्रीय कार्यात स्वयंस्फूर्त सहभागी होऊन निरपेक्ष सेवा कार्य करणारे मुकुंद गोसावी हे आपल्या सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे कार्यरत असून नुकताच आपल्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षरोपण, विशेष मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर ,सत्संग सेवा कार्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते,शहीद दिवसाचे औचित्य साधून सर्वप्रथम क्रांतिकारी अमर शहीद भगतसिंहजी ,राजगुरूजी, सुखदेवजी, यांना वंदन करून राष्ट्रसंत गाडगे बाबा प्रतिमा पूजनाने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील राष्ट्रसंत गाडगे महाराज बेघर निवारा केंद्र येथे आर.एल .मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार,मार्गदर्शन तसेच वृक्षरोप देऊन व रामद्वारा तर्फे विशेष सत्संग कार्यक्रमाने केला. सोबतच इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रेडक्रॉस भवन येथे शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांन आपले स्वयंभू रक्तदानही करून सध्या तप्त उन्हाळा तसेच लग्नसराई ,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा व पुढे येणाऱ्या सुट्ट्या यामुळे सुरळीत रक्तपुरवठ्या करिता मोठी अडचण निर्माण होणार असल्याने अठरा वर्षावरील 50 किलो वजन असलेले कुणीही सहज रक्तदान करून जीवन देऊ शकतो. याकरिता आपण सर्वांनी रक्तदानाच्या
पावन कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास संत गाडगे महाराज शिक्षण संस्थेचे प्रशांत गायकवाड, मनपाच्या गायत्री पाटील,
आर. एल . मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची टीम,स्वप्निल पालवे ,व्यवस्थापक मनोज कुलकर्णी ,काळजीवाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, सौ शितल काटे,वैभव निकुंभ, कल्पेशपुरी,मुक्ता गोसावी यांचे सहकार्य लाभले.