सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणे भोवले

सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणे भोवले
भडगाव पोलीस स्टेशनला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
घटनास्थळावरून चारही आरोपी अद्याप पर्यंत फरार
भडगाव प्रतिनिधी सार्वजनिक शांततेचा भंग करत रात्री बारा वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील चाळीसगाव रोडवरील एका हॉटेलच्या समोर एकमेकांमध्ये मारामारी करत असताना सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून चार जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला पोलिसाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पो.हे.कॉ. निलेश ब्राह्मणकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३०रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील हॉटेल सत्कार समोर सागर पाटील रा.वाक,संजय त्रिभुवन,सागर ह्यालिंगे, हेमंत उर्फ नाट्या पाटील, हे चारही जण सार्वजनिक जागी एकमेका सोबत मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवताना मिळून आले म्हणून वरील चारींच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.न.२०१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९४/२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. प्रदीप चौधरी हे करीत आहे.