सुशासन सप्ताह “प्रशासन गाव की और” 23 रोजी तालुका स्तरावरील लोकशाही दिन
जळगाव, प्रशासकीय सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत सुशासन सप्ताह (Good Governance Week) अंतर्गत प्रशासन गाव की ओर मोहीम दि. 19 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान लोकशाही दिन राबविण्यात येत आहे.
या मोहिमे दरम्यान तालुक्यातील मंडळ स्तरावर लोकांच्या तक्रारी, विविध प्रश्न, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मंडळ स्तरावर तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
येत्या सोमवारी म्हणजे दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली अल्प बचत सभागृह तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
लोकशाही दिनासाठी अधिनस्त कार्यालय प्रमुखांनी आणि समस्याग्रस्तांनी न चुकता उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार राहूल वाघ यांनी केले आहे.