सुसाईड नोट लिहित माय लेकीने उचलले टोकाचे पाऊल..

एरंडोल शहरातील दुर्दैवी घटना
एरंडोल प्रतिनिधी:- एका घटस्फोटीत महिलेने सुसाईड नोट लिहून आपल्या नऊ वर्षीय मुलीसोबत छताला दोराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील जहांगीर पुरा भागात उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सपना प्रकाश माळी ( वय ३३ )आणि केतकी प्रकाश माळी (वय ९) मृत माय लेकीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,एरंडोल येथील जहांगिरपुरा भागातल्या महादेव मंदिराजवळ सपना प्रकाश माळी यांचा आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असल्याने त्या मुलगी केतकी हिच्यासोबत वास्तव्याला होत्या.
दरम्यान, गुरूवार दिनांक 26 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सपना माळी यांनी आपल्या नऊ वर्षीय मुलीसह घराच्या छताला दोराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.