Crime

ब्रेकिंग : रावेर शहरात तीन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

एका दुकानाचे कुलूप तोडले : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महा पोलीस न्यूज । शकील शेख । रावेर शहरातील महात्मा गांधी चौक परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार दुकानांवर धाडसी हल्ला चढवत तीन दुकानांमधून चोरी केली. चौथ्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी चोरी टळली. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

प्रथमदर्शनी प्राप्त माहितीनुसार, चोरीच्या घटना शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात घडल्या. पहिली घटना : महेंद्र ताराचंद्र लोहार यांच्या ‘न्यू मनोज जनरल स्टोअर्स’चे कुलूप तोडून चोरी. दुसरी घटना : शेख सादिक यांच्या ‘युनिक किराणा स्टोअर’चे शटर वाकवून चोरी. तिसरी घटना : भूषण कोळी यांच्या ‘महादेव मेडिकल’चे कुलूप तोडून चोरी. चौथी घटना : शरीफभाई पन्नीवाले यांच्या दुकानाचे कुलूप तोडले गेले, मात्र चोरी झाली नाही.

सकाळी ही माहिती समजताच परिसरात नागरिकांची एकच गर्दी केली होती.काही नागरिकांनी सांगितले की, रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान शहरात मोटर सायकलवरून वाळू तस्कर फिरताना दिसतात. लोकांना शहरात फिरणारे काही अनोळखी लोक वाळू तस्कर असतील या भ्रमात अनोळखी लोकांनकडे दुर्लक्ष केले जाते.

या प्रकारानंतर नागरिकांनी शहरात रात्रीची वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या सर्व चोरीच्या घटनांची चौकशी सुरू केली असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button