
जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी) –एका 25 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास शहरातील नेहरू नगर येथे घडली.याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शुभम रविंद्र मराठे (वय २५, रा. नेहरू नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे .या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शुभमचे वडील रविंद्र मराठे हे मोहाडी रोडवरील हॉटेल व्यवसायिक असून त्यांच्या व्यवसायाला हातभार लावून शुभम एका फायनान्स कंपनीही नोकरीला होता
आज 10 रोजी बुधवारी दुपारी घरामध्ये कोणी नसताना शुभमने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले.
शुभमने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे..याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान शुभम याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.






