Crime

चाळीसगाव घरफोडी प्रकरणात एकाला अटक 

चाळीसगाव घरफोडी प्रकरणात एकाला अटक 

तीन फरार आरोपींचा शोध सुरू ; संशयीताकडून कारसह मुद्देमाल हस्तगत

चाळीसगाव | महा पोलीस न्यूज l चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, या प्रकरणातील चार आरोपींपैकी एकास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर क्रमांक 144/2025, भारतीय नवीन दंडसंहिता कलम 305, 331(3) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासात हे यश मिळाले.

तपासादरम्यान कैलास चिंतामण मोरे, रा. मोहाडी, धुळे, राहुल प्रभाकर अहिरे, रा. सोनगीर, धुळे, जयप्रकाश यादव, रा. उत्तरप्रदेश, वीरेन ठाकूर, रा. उत्तरप्रदेश अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली होती.

या आरोपींपैकी  राहुल अहिरे हा मिळून आला असून, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे मान्य केले असून, गुन्हा करताना वापरण्यात आलेली i20 चारचाकी कार व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. शेखर डोमाळे, हेका. मुरलीधर धनगर ,पोना. दीपक माळी ,पोशि. महेश पाटील ,पोशि. भूषण शेलार , पोशि. सागर पाटील, चालक हेकॉ. दीपक चौधरी व भरत पाटील यांच्या पथकाने केली

दरम्यान अटक आरोपीकडे सखोल तपास करण्यात आला असता, त्याने आपल्या इतर साथीदारांसह मागील काही दिवसांत जळगाव शहर, संभाजीनगर जिल्हा व अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीला चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button