रावेर तालुक्यात साडेसात कोटींच्या कामाला मंजुरी, योजनेचे भूमिपूजन
महा पोलीस न्यूज | ८ मार्च २०२४ | रावेर मतदारसंघातील कुसुंबा ते रावेर रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा व सिंदखेडा ते एम.आय.डि.सी.फाटा रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना तसेच आमदार निधीतून गावातील रस्ते काँक्रिटीकरण आणि विविध विकास निधी अंतर्गत आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला.
रावेर तालुक्यातील विविध कामांसाठी ७ कोटी ४४ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर कामामध्ये कुसुंबा बु. ता. रावेर येथे मधुकर दलपत घोडके ते लोहारा रोड ते रमेश किसन महाजन यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक – ४ लक्ष, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ ८६.२३ लक्ष, कुसुंबा खु, ता. रावेर येथे मुकुंदा धनगर ते शाळेचे कंपाऊड पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण ४ लक्ष, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ ७६.३४ लक्ष, सिंदखेडा, ता. रावेर येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण ४ लक्ष, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ ९४.७० लक्ष, मुंजलवाडी, ता. रावेर येथे तडवी वस्तीत कॉक्रीटीकरण ५ लक्ष, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ ९५.५२ लक्ष, तसेच सिंदखेडा ते एम.आय.डि.सी. फाटा मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९० लक्ष, उमर्टि वैजापूर लंगडा आंबा मांजल पाल कुसुंबा रावेर रस्ता प्रजिमा १ कि.मी ११० ते ११२ कि.मी, ११५ ते १२१/५०० ची रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे २८५ लक्ष या कामांचे भूमिपूजन व काही कामांचे लोकार्पण झाले.
यावेळी सोबत डॉ.राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, प्रल्हाद बोडे, सुनील कोंडे, मुजलवाडी सरपंच योगेश पाटील, माजी सरपंच अतुल पाटील, गारबर्डी सरपंच रतन बारेला, लक्ष्मन मोपारी, लोहारा उपसरपंच मजीद तडवी, कुसुंबा सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच मुकेश पाटील, सुनिल महाजन, धुमा तायडे, सावन मेंढे, संतोष पाटील, कुसुम्बा बु. सरपंच शबाना तडवी, महेंद्र महाजन, विवेक महाजन, सुनील बोरणारे, विनोद महाजन, प्रदीप सपकाळे, रमेश भालेराव, खुदाबक्ष तडवी, गुरुजी पिंटू पवार, सलीम तडवी, उत्तम चव्हाण, चतुर राणे, विलास ताठे, चेतन चौधरी, नितीन चौधरी, संजय भालेराव, मुस्तकीम शेख, संतोष पाटील, रामदास लहासे, संजू जमादार, डॉ.सुरेश पाटील, कडू महाजन, विनोद महाजन, संजू तडवी, जितेंद्र पाटील, सलीम तडवी, गफ्फार तडवी, मुकुंदा धनगर, किरण महाजन, गफूर तडवी, निवृत्ती महाजन, अयुब तडवी, पितांबर चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, शिवदास पाटील, शिंदखेडा येथील सरपंच संगीता पाटील, विनायक चौधरी, शांताराम पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, विकी पाटील, गोपाळ पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, विठ्ठल पाटील, संतोष चौधरी, कोमल चौधरी, गजानन पाटील, विनोद पाटील, दिलीप वैद्य, रवी महाजन, मुजलवाडी ललित पाटील, अजलसोंडे सरपंच अशोक हिवराळे, रवींद्र हडपे, पंकज वाघ, भैया पाटील, संतोष पाटील, अण्णाजी पाटील, धिरज पाटील, प्रदीप पाटील, पंडित पाटील, प्रकाश सूरदास व परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.