Other

चोरट्यांची कमाल ! ; उभ्या वाहनातून चार लाख रुपयांची सिगारेट पाकिट लांबविली

चोरट्यांची कमाल ! ; उभ्या वाहनातून चार लाख रुपयांची सिगारेट पाकिट लांबविली

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : पान टपरी व्यावसायिकाच्या पार्किंगला लावलेल्या वाहनातून अज्ञात चोरट्यांनी वाहनाचे कुलूप तोडून वाहनातील सुमारे चार लाख रुपये किमतीचे सिगारेट पाकिटे चोरून नेल्याची खळबळ जनक घटना शहरात असणाऱ्या गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ 28 रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी पेठ परिसरात राहणारे चंद्रशेखर जवरीलाल राका (वय ५०) हे गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ पानटपरी चालवतात. नेहमीप्रमाणे २७ जून रोजी रात्री त्यांनी आपल्या दुकानासमोर वाहन क्रमांक एमएच १८ सीवाय ०१२३ पार्क करून त्यात सिगारेटचे सुमारे चार लाख रुपये किमतीचे पाकिट ठेवले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वाहनाचे दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील सिगारेटची पाकिटे चोरून नेली.

ही घटना २८ जून रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. त्यानंतर चंद्रशेखर राका यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल पाटील करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button