Crime
भुसावळ शहरातील मोकाट जनावरांकरिता कोंडवाडा बनविण्याची केदार सानप यांची मागणी

भुसावळ शहरातील मोकाट जनावरांकरिता कोंडवाडा बनविण्याची केदार सानप यांची मागणी
भुसावळ प्रतिनिधी l भुसावळ शहरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्यामुळे तात्काळ कोंडवाडा बनविण्याबाबत सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहरामध्ये मोकाट जनावरे रोडच्या बाजुला व रोडवर येवून अपघात होत आहेत व रहदारीकरिता सुद्धा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ आपल्या स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश देवून कोंडवाडा बनविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी केली असून झालेल्या कारवाईची एक प्रत माहीतीस्तव मला देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.