राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव ग्रामीण रुग्णालयात व मुक बधीर शाळेत शालेय साहित्य, फळ वाटप

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव ग्रामीण रुग्णालयात व मुक बधीर शाळेत शालेय साहित्य, फळ वाटप
भडगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भडगाव तालुकाध्यक्ष रवींद्र अहिरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब रुग्णांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन फळ वाटप व मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळ वाटप करून अत्यंत साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला .यावेळी चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते पांडुरंग बाविस्कर, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, डी.डी.पाटील सर, तालुका उपाध्यक्ष मधुकर वाघ,युवा तालुकाध्यक्ष सुधीर अहिरे, दिलीप वाघ,दगडू गायकवाड,गणेश अहिरे,मोहित अहिरे,विशाल पाटोळे,राजू भोई,आदींच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, तसेच वाढदिवसाच्या दिवशी डॉक्टर डे असल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव डॉ.नितीन गेडाम, डॉ पूनम काळे,किरण अमृतकर,प्रदीप कोठावदे,दीपक चव्हाण,सीमा राठोड,रवींद्र कुलकर्णी दिनेश महाजन, आदि कर्मचाऱ्यांचा पांडुरंग बाविस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र अहिरे यांनी आभार मानले.