क्षुल्लक कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, जखमीला मुंबईला हलवले

महा पोलीस न्यूज । दि.१८ सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरातील मास्टर कॉलनीजवळ असलेल्या नशेमन कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना अजिंठा चौफुली येथे घडली. राहील खान रहीम खान असे जखमी तरुणाचे नाव असून रेडीमेड पँट परत करण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. दरम्यान, तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
जुनेद खान युनुस खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी वरील ठिकाणी पत्नी, मुले व आई वडिलांसह राहतो. व हमाली व्यवसाय करतो. तसेच माझे चुलते रहीम खान नसीर खान त्यांचे मुले समीर खान राहील खान व कुंटुंबासह आम्ही सर्व एकत्र राहतो. तसेच माझा चुलत भाऊ राहील खान रहीम खान याचे फंकी बॉइज नावाचे रेडीमेट कपडे विक्रीचे दुकान असुन तो ते चालवीत असतो. दि.१३ रोजी सायंकाळी ६ वाजता शरीफ खान गुलाब खान हे त्यांनी काही दिवसापुर्वी दुकानातुन विकत घेतलेली पॅन्ट परत दुकानावर बदलवण्यासाठी घेवुन आले व त्यांनी सांगीतले की सदर पॅन्ट बदली कॅरुन पाहीजे आहे. तेंव्हा माझा भाऊ राहील खान रहीम खान याने सदर पॅन्ट चेक करत असतांना ती पॅन्ट धुतली असल्याचे वाटत असल्याने त्यांना ही पॅन्ट तुम्ही धुवुन आलेली आहे काय असे विचारले असता शरीफ खान याने तुम्ही माझी मजाक करत आहेत का असे बोलुन ती पैन्ट दुकानावरच सोडुन निघुन गेले.
त्याच दिवशी रात्री ९ वाजता शरिफ खान व त्यांचा मुलगा इरफान, व इम्रान व त्यांचा मित्र वसीम असे भाऊ राहील खान रहीम खान याचे दुकानासमोर येवुन त्यांनी भाऊशी वाद केला होता, पंरतु आमचे समाजाचे प्रतीष्ठीत नागरीकांचे मध्यस्थीने तो वाद तिथेच मिटला होता. दि.१४ रोजी दुपारी १.१५ वाजता अजिंठा चौफुलीजवळ इदगाह कॉम्पलेक्सजवळ मी व माझा चुलत भाऊ राहील खान रहीम खान असे नमाज पढून आल्यावर उभे होते. त्याठिकाणी इम्रान हा आमचे मागुन आला व राहील खान रहीम खान यास पकडून शिवीगाळ करून तुम्ही काल माझ्या वडीलांची मज्जा घेतली आहे. असे बोलुन त्याने मागे कमरेत लपवलेली लोखंडी टॉमी काढुन राहील खान रहीम खान याचे डाव्या भोईच्यावर कपाळावर मारुन गंभीर दुखापत केली. तेंव्हा मी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने मला ही चापटा बुक्यांनी मारहाण केली. भांडण पाहून त्यावेळी तेथे असलेल्या काही लोकांनी भांडण सोडविले.
राहील खान रहीम खान याचे डोक्यातुन खुप रक्त स्त्राव होत असल्याने मी त्यास रिक्षाने पोलीस स्टेशनला घेवून आलो. पोलीसांनी आम्हाला उपचाराकामी मेमो दिल्याने आम्ही राहील खान रहीम खान यास उपचार कामी सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे घेवुन गेलो, तेथे डॉक्टर यांनी सीटी स्कॅन केल्यानंतर त्याला मार लागलेल्या ठिकाणी हाड फॅक्चर झाल्याचे सांगितले त्याचे वर औषधउपचार चालु असुन तो बोलण्याचे परीस्थीत नव्हता. इम्रान शरीफ खान उर्फ गोमा याने मला व माझा चुलत भाऊ राहील अशांना शीवीगाळ मारहाण केली म्हणून त्याच्याविरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.