PoliticsSocial

शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला 6 अग्निशमन गाड्या ;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला 6 अग्निशमन गाड्या ;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान सर्व 6 नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील अधिकारी यांना वाहनाच्या प्रतिकात्मक चाबी देत लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील भुसावळ, चोपड़ा चाळीसगाव, पाचोरा, जामनेर,अमळनेर या नगरपालिका/नगरपरिषदेसाठी अग्निशामन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील,आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील,
आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षकडॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ उपस्थित होते.

*मिनी फायर अँड रेस्क्यू व्हेईकल एम एफ आर व्ही ची वैशिष्ट्ये*
प्रगत आपत्कालीन प्रतिसाद युनिटचे वाहन हाय प्रेशर वॉटर मीटर सिस्टीम,हाय प्रेशर वॉटर मिटर सिस्टीम,फोम प्रेशर सिस्टीम.आपत्कालीन रेस्क्यू टूल्स (बचाव कार्य साहीत्य).
आग, भूस्खलन, पूर, रेल्वे अपघात यासह विविध आपत्ती दरम्यान तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा यात आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील आपत्ती झोन पर्यंत पोहोचण्याची क्षमता. जिल्ह्यातील जीवित व वित्तहानीशी सक्षमपणे सामना करण्यासाठी जिल्ह्याची अग्निशमन यंत्रणा अद्यावत असणे आवश्यक होती, त्याची पूर्तता झाली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button