Education

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : सीईओ मीनल करनवाल

महा पोलीस न्यूज । दि.३० जून २०२५ । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल यांनी गुरुवार, दि. 26 जून रोजी पाचोरा व भडगाव तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त जळगाव तालुक्यातील विविध शासकीय संस्थांना अचानक भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी प्रशासनाची शिस्त व कार्यक्षमतेचा आढावा घेतला.

दौऱ्यादरम्यान जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील आरोग्य उपकेंद्रात पाहणी करत असताना आरोग्य सेविका व मदतनीस हे दोघेही गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांचे उत्तर मागवून त्यांचे एक दिवसाचे वेतन थांबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच, पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेला दिलेल्या भेटीत एका शिक्षकाच्या कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजेरीची नोंद आढळली. याबाबतही शिक्षकाला नोटीस बजावत त्याचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दौऱ्यात करनवाल यांनी पाचोरा तालुक्यातील लसगाव येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता व सुविधा यांची माहिती घेतली. तसेच, बांबूरुड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट देऊन तेथील सेवा सुविधा, औषध साठा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती यांचा आढावा घेतला.

या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेचे भान राखण्याचे, नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे आणि शिस्तबद्ध प्रशासन राबवण्याचे निर्देश दिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button