वाडे विदयालयातील विदयार्थ्यांची रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅली

वाडे विदयालयातील विदयार्थ्यांची रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅली
भडगाव प्रतिनिधी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्ते सुरक्षा सप्ताहाचे माध्यमातून माध्यमिक विद्यालय वाडे शाळेच्या विद्यार्थ्यांची वाडे गावात जनजागृती रॅली काढण्यात आली.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जळगाव शाखेचे कनिष्ठ अभियंता अभिजीतसिंग इंदल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम व वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात कसे टाळता येतील? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कनिष्ठ अभियंता अभिजीतसिंग इंदल राजपुत, माध्यमिक विद्यालय वाडे शाळेचे पर्यवेक्षक एस पी पाटील, एस डी महाजन, बी ए परदेशी, एस एस पाटील, एस बी पाटील, ए आर कोळी, एस डी मोरे, डी ए पाटील, पी एल वाघ, बी जे पवार, एन व्ही पाटील, एस ए साळुंखे, के आर जाधव,श्री डी एस पाटोळे, एस एन मोरे, डी पी सुर्यवंशी उपस्थित होते.