चाळीसगावात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा ; एकलव्य संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

चाळीसगावात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा ; एकलव्य संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन
चाळीसगाव प्रतिनिधी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर २०२५) चाळीसगाव तहसील कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. क्रांतीवीर तात्यासाहेब तंट्याभील यांच्या जयंतीनिमित्त हा मोर्चा काढून आदिवासी बांधवांच्या मूलभूत अधिकारांबाबत आवाज उठविण्यात आला.
मोर्चादरम्यान बंजारा समाजासह कोणताही अन्य समाजगट आदिवासी (एस.टी.) आरक्षणात समाविष्ट करू नये. बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी शिफारस पत्र देणाऱ्या आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात यावा.अशी मागणी यावेळी करण्यात आली .
या मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव ढवळे (म्हाडा सभापती व माजी राज्यमंत्री) यांनी केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
मोर्चामध्ये तहसीलदारांना निवेदन देऊन मागण्या मान्य करण्याचे आवाहन करण्यात आले.






