Politics
मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी मुंबई ऐवजी नागपुरात होणार ?

मुंबई/नागपूर;- एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येत असून महायुतीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा मुंबई ऐवजी नागपुरात होण्याची दाट शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तवली असून 16 डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई ऐवजी नागपूर येथे हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिले आहे. त्यानुसार मंत्री मंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 रोजी नागपूरच्या राजभवन किंवा विधान भवनात होऊ शकतो त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात घेण्याची शक्यता आहे.