अहिल्यानगर घटनेचा अहेले सुन्नत वल जमात तर्फे निषेध

अहिल्यानगर घटनेचा अहेले सुन्नत वल जमात तर्फे निषेध
जळगाव (प्रतिनिधी) :– भारतीय संविधान सर्वांना आपल्या सण-उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य देत असले तरी त्यात अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र अहिल्यानगरातील माळीवाडा भागात शिव प्रतिष्ठान संघटनेतर्फे आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात काही ठिकाणी काढलेल्या रांगोळ्यांमध्ये इस्लामचे अंतिम प्रेषित (सलै.) यांचे पवित्र नाव लिहून त्यावरून दौड सहभागी पाय ठेवत धावत गेले. त्यामुळे या पवित्र नावाची विटंबना झाल्याचा आरोप होत असून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ अहेले सुन्नत वल जमात, जळगाव तर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले. समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करताना सून्नी जामा मस्जिद ट्रस्ट जळगाव व सून्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद उमर, नूरा पहेलवान, सय्यद जावेद, अहेमद ठेकेदार, फिरोज इकबाल, नाझीम पेंटर, हाजी शेख सलीमुद्दिन, शेख जमील, कामिल खान, शफी ठेकेदार, काशीफ अब्दुल सलाम, शेख नूर मुहम्मद, तनवीर लतीफ, शेख नझीर, महेमूद खान, शाकिब फारुख आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.






