३० वर्षांच्या विश्वासाला आधुनिकतेची जोड; ‘ऐनक प्लस’चे उद्या जळगावात भव्य उद्घाटन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगावकरांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या गुरुनानक ऑप्टिकलच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाला आता आधुनिकतेची जोड मिळत असून ‘ऐनक प्लस’ या नव्या अत्याधुनिक दालनाच्या माध्यमातून सेवा अधिक विस्तारली जाणार आहे. रिंग रोडवरील आरके टॉवर येथे हे नवीन शोरूम ग्राहकांसाठी सज्ज झाले असून उद्या, दि.५ एप्रिल रोजी त्याचा शुभारंभ होणार आहे.
गेल्या तीन दशकांपासून ऑप्टिकल क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने होलसेल व्यवसायातून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आता ‘ऐनक प्लस’च्या रूपाने रिटेल क्षेत्रात आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानासह ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्या दालनात अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या शोरूममध्ये नामांकित कंपन्यांच्या विविध प्रकारच्या फ्रेम्स, गॉगल्स आणि लेन्सेस उपलब्ध असतील. वातानुकूलित आणि प्रशस्त दालनात ग्राहकांना आकर्षक डिझाइनसह वाजवी दरात उत्पादने मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ‘ऐनक प्लस’चा शुभारंभ उद्या सायंकाळी ६ वाजता होणार असून, जळगावकर नागरिकांनी या नव्या दालनाला भेट देण्याचे आवाहन संचालक दिनेश गेही आणि आकाश घुमनानी यांनी केले आहे.






