पोलिसात दिलेली तक्रार मागे न घेतल्याने तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

अमळनेर:- जुन्या भांडणाच्या कारणावरून पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्याने ती मागे न घेतल्यास लहान भावाला मारून देण्याची धमकी देत अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न एकाने केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीची आई ही गच्चीवर कपडे टाकण्यास 3 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास गेली असता आरोपी भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे याने घरात शिरून लहान भावाला झोका देणाऱ्या 11 वर्षीय मुलीला पकडून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरड केल्यामुळे पीडित मुलीची आई धावून आल्याने आरोपी हा पळून गेला. पीडित मुलीशी याबाबत विचारणा केले असता तिने भाऊसाहेब याने घरात येत पॅन्ट काढून पूर्ण कपडे न काढल्यास तुझ्या लहान भावाला मारून टाकेल अशी धमकी दिल्याची हकीकत कथन केली.
याबाबत फिर्यादी पहिला ही त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी भाऊसाहेब याच्या आईकडे गेली असता त्याची आई उषाबाई बोरसे हिने शिवीगाळ करून आमच्या विरुद्ध पोलिसात केलेल्या तक्रारीत 35 जणांची नावे टाकली असून ती कमी न केल्यास आम्ही असेच करू अशी धमकी दिली.
यानंतर पीडित मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्टेशनला धाव घेत 4 रोजी भाऊसाहेब उर्फ प्रशांत बोरसे याच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर हे करीत आहेत.