Politics

अमळनेर नगर परिषदेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध

अमळनेर (पंकज शेटे): सोमवारी अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया शांततेत व निर्विरोध पार पडली. नगर परिषदेतील विविध समित्यांवर सभापतीपदासाठी झालेल्या निवडीत सर्व पदांवर एकमताने निर्णय घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक साहेबराव वसंत पवार यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी कैलास नामदेव पाटील, तर आरोग्य समितीच्या सभापतीपदी रामकृष्ण बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी शेख नविद अहमद मुशिरोद्दीन, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी स्वाती सुरजसिंह परदेशी यांची निवड जाहीर करण्यात आली.

तसेच योजना व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष प्रशांत मनोहर निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात.

स्थायी समितीच्या सदस्यपदी शिवसेना गटातून श्रीराम भगवान चौधरी, अपक्ष गटातून महेश प्रभाकर देशमुख, तर शहर विकास आघाडीच्या वतीने भरत सुरेश ललवानी यांची निवड करण्यात आली. सदर निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी मयूर भंगाळे यांनी केली.

या निवड प्रक्रियेप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. विविध समित्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button