Other

अमळनेर येथील ‘रऊफ बँड’ संचालकाविरुद्ध कठोर कारवाईची भाजपची मागणी

अमळनेर येथील ‘रऊफ बँड’ संचालकाविरुद्ध कठोर कारवाईची भाजपची मागणी

जळगाव l महा पोलीस न्यूज l दि. २७ मे २०२५l

अमळनेर येथील ‘रऊफ बँड’चे संचालक अस्लम अली सय्यद यांच्यावर अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले.

अमळनेर तालुक्यातील धानोरी येथे एका १५ वर्षीय मुलीला फसवून अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अस्लम सय्यद याच्याविरोधात  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ‘रऊफ बँड’च्या वाहनांचा वापर झाल्याचे समोर आले असून, यामुळे वाहतूक नियम आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपच्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:

रऊफ बँडचे वाहन तात्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि पोलिस तपासात समाविष्ट करावे.

आरोपी अस्लम अली सय्यद आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) तपासून संपूर्ण माहिती उघड करावी.

या प्रकरणातील सर्व संबंधितांवर बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

ही घटना समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारी असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने त्वरित व ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भारतीताई सोनवणे, प्रदेश चिटणीस व माजी नगरसेविका सुरेखा तायडे, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, मनोज भांडारकर, गजानन धीरज वर्मा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button