Crime

मध्य प्रदेशातून तीन चोरीची वाहने जप्त; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई, एक संशयित अटकेत

मध्य प्रदेशातून तीन चोरीची वाहने जप्त; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई, एक संशयित अटकेत

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरातील वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावत अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मोठी कारवाई केली. या कारवाईत चोरीची तीन महागडी चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

२४ मे २०२५ रोजी रात्री १०.३० ते २५ मे रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ओमसाई श्रद्धा नगर येथून प्रविण हरिश्चंद्र ठाकूर (वय ४४) यांच्या मालकीची मारुती सुझुकी डिझायर (MH18 AJ 3110) अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मध्य प्रदेशातील सीतामऊ तालुक्यातील रावती गावात धाड टाकली.

तेथे संशयित राहुल पाटीदार यांच्या गोडाऊनमध्ये शोध घेतला असता खालीलप्रमाणे चोरीची वाहने सापडली:

अंदाजे ३५ लाख रुपये किंमतीची टोयोटा फॉर्च्युनर (CG10 BL 6776), चेसिस नंबर नष्ट.

अंदाजे १२ लाख रुपये किंमतीची हुंडई क्रेटा (MP04 Z12963), चेसिस आणि इंजिन नंबर नष्ट.

अमळनेरमधून चोरीस गेलेली मारुती सुझुकी डिझायर (MH18 AJ 3110).

सर्व वाहने जप्त करून अमळनेर पोलीस ठाण्यात आणली असून, प्राथमिक चौकशीत फॉर्च्युनर ही नागपूरच्या राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यातील आणि क्रेटा ही जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मामदेव बोरकर, विनोद संदानशिव, निलेश मोरे, प्रशांत पाटील आणि उज्वल म्हस्के यांनी केली. संशयित राहुल पाटीदार याच्याकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button