‘नेत्रम’ची नजर आता अमळनेरवर!

‘नेत्रम’ची नजर आता अमळनेरवर!
शहरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे खा.स्मिता वाघ यांच्याहस्ते उद्घाटन
अमळनेर – पंकज शेटे l महापोलीस न्यूज
अमळनेर शहराच्या सुरक्षेसाठी आता ‘नेत्रम’ यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस स्टेशनमधूनच संपूर्ण शहरावर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर ठेवता येणार आहे.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे आता एकाच नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असून, या नव्या यंत्रणेचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, “अमळनेरमधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावेल. पोलीस स्टेशनमधूनच शहरावर नजर ठेवता येणं ही काळाची गरज होती. असेही त्या यावेळी म्हणाल्या .
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, माजी जि.प. सदस्य जयश्री पाटील, डीवायएसपी विनायक कोते आणि डीवायएसपी केदार बारबोले आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, “आमदार निधी आणि लोकसहभागातून बसवलेले कॅमेरे पोलीस स्टेशनशी जोडण्यात आले असून, त्यांची देखभाल व देखरेख आता पोलीस यंत्रणा करेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या यंत्रणेच्या स्थापनेत तत्कालीन प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
या उद्घाटन प्रसंगी महिला दक्षता समितीच्या सुलोचना वाघ, माधुरी पाटील, प्रा. शीला पाटील, प्रमोदिनी पाटील, अलका गोसावी, भारती शिंदे यांच्यासह, के. डी. बापू, मुख्तार खाटीक, महेंद्र बोरसे, योगेश महाजन, राकेश पाटील, सुरेश पाटील, इम्रान खाटीक, सलीम टोपी, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशीव, आरिफ भाया, फिरोज मिस्तरी, नरेंद्र संदानशीव हे उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले.