अनिल भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप व अन्नदान
जळगाव (प्रतिनिधी )अनिल भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांना फळ वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम करत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
अनिल भाऊ चौधरी यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील रुग्णांनी तसेच गोरगरीब जनतेने भाऊंना भरभरून आशीर्वाद दिलेत यावेळी अनिल भाऊ चौधरी यांच्या मित्र परिवारातील प्रहार वैद्यकीय संघटनेचे नरेंद्र सपकाळे, मनोज भाऊ पाटील, चंदू भाऊ श्रावणे, अल्लाबक्ष बागवान, मोईनुद्दीन तडवी राजू पटेल विशाल पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्ही सेवेचा झेंडा घेऊन हाती काम करत असल्याचे सांगत आमचा सेवेचा झेंडा कधीही झुकणार नाही आमची सेवा ही अविरतपणे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय गोरगरीब कष्टकरी शेतकरी दिव्यांगांचे नेते माननीय बच्चुभाऊ कडू व जळगाव जिल्ह्यातील युवा हृदय सम्राट माननीय अनिल भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून सुरू असेल असे यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. व अनिल भाऊ चौधरी यांना शुभेच्छा दिल्यात