लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अमळनेरमध्ये १०५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । समाजाला आपल्या लेखणीतून दिशा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शहरातील धुळे रोडवरील त्यांच्या स्मारकात आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या क्रांतिकारी विचारांवर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजातल्या गरीब आणि कष्टकरी लोकांचे दुःख मांडले. त्यांच्या पोवाड्यांनी आणि कथांनी समाजात एक नवी जागृती निर्माण केली, असे अनेक वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी जिल्हा सदस्या जयश्री पाटील, लेखक हरिश्चंद्र कढरे, प्रा.अशोक पवार,डॉ. विजय तुंटे, माजी जी प सदस्य संदीप पाटील,पत्रकार समाधान मैराळे, प्रविण बैसाणे, सुरेश कांबळे, नूर खान,आत्माराम अहिरे,विजय गाढे, अशोक बिऱ्हाडे,अजय भामरे,सुरेंद्र जैन,डॉ.नीरज चव्हाण, आप्पा दाभाडे, चिंधू वानखेडे,जितू कढरे,तात्या वैदू, गोरख साळुंखे, दयाराम पवार, प्रभाकर पारधी, तसेच अँड.तिलोत्तमा पाटील, डॉ. राजू कांबळे आणि प्रवीण शिरसाठ, अनिकेत ब्रम्हे, दिनेश नाईक, तायडे सर, मनोहर पाटील, अभिषेक पाटील, प्रकाश तायडे, विशाल गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्याची प्रेरणादायी बाजू समाजापुढे मांडली.
कार्यक्रमात विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेने अण्णाभाऊंच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे मोफत वाटप केले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बैसाणे यांनी, नव्या पिढीला अण्णाभाऊंचे विचार कळावेत, या हेतूने हा उपक्रम राबवल्याचे सांगितले. या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यक्रमातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.