Crime
अज्ञात वाहनाच्या धडकेत पती पत्नी ठार ; रणथम फाट्याजवळील घटना

मुक्ताईनगर प्रतिनिधी I कांद्याचे रोप घेण्यासाठी दुचाकी वरून जात असतांना अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी रणथम फाट्याजवळ घडली.याप्रकरणीपोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेड येथील नीना ज्ञानदेव नारखेडे (वय ६५) व सुनीता नीना नारखेडे (वय ५९) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे.
नारखेडे दाम्पत्य हे हे पुर्णा काठावरील दूधलगाव येथे साळ भावाकडे कांद्याचे रोप घेण्यासाठी गेले होते. परतीच्या मार्गाने रूईखेड येथे घराकडे जाताना रणथम फाट्यानजीक त्यांच्या दुचकीला अज्ञात वाहनाने जोरफार धडक दिली. त्यात दोघा पती – पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.