Crime

गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह शाहूनगरमधील तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव: शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

नेमकी घटना काय?

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, १० फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शाहूनगरमधील एक तरुण उस्मानिया पार्क परिसरात मोटरसायकलवर गावठी कट्टा घेऊन फिरत आहे.

पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उस्मानिया पार्क परिसरात सापळा लावून मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहूनगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ०१ गावठी कट्टा आणि ०३ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी शस्त्रे आणि त्याची मोटरसायकल जप्त केली आहे.

गुन्हा दाखल

आरोपीविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा (गु.र.क्र. ३७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस हवालदार सुनील पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बावीस्कर, विलेश सोनवणे, किशोर पाटील आणि रवींद्र कापडणे यांचा समावेश होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button