बागेश्वर धाम सरकार प.पू.धीरेंद्र शास्त्री जळगाव जिल्ह्यात येणार!
झुरखेडा येथे भव्य श्री हनुमंत कथा व दिव्य दरबारचे आयोजन : दररोज २ लाखांपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती
महा पोलीस न्यूज । दि.१९ डिसेंबर २०२४ । शहरानजीक असलेल्या पारधी जवळील झुरखेडा पथराड मार्गावर दिनांक २५ ते ३० डिसेंबर दरम्यान देशभरात प्रख्यात असलेल्या भागेश्वर धाम स्थित परमपूज्य पंडित श्री धीरेंद्र शास्त्रीजींच्या श्री मुखातून श्री हनुमंत कथा व दिव्य दरबाराचे भव्य दिव्य आयोजन श्री स्वयंभू चैत्यन्यराम ट्रस्ट झुरखेडा, झुरखेडा ग्रामस्थ व स्थानिक सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यात झुरखेडा येथे ही दुसरीच कथा होत आहे.
देशभरातून भाविक भक्त बागेश्वर बाबा यांच्या कथेचा लाभ घेण्यासाठी कथास्थळी मोठ्या संख्येने पोचणार आहेत या भव्य श्री हनुमंत कथेला श्रवण करण्यासाठी रोज जवळपास दोन लाख भाविक कथेला हजेरी लावणार असल्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. गुरूवारी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
झुरखेडा कथास्थळी भव्य नियोजनाला वेग, तयारी पूर्णत्वाकडे..
झुरखेडा निमखेडा ते पथराड मार्गालगत १०० एकर जागेतील परिसरात बागेश्वर बाबांच्या श्री हनुमंत कथा व दिव्य दरबार या साठी काटेकोर नियोजन मार्गदर्शक व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. या परिसरातील शेतीचे क्षेत्र सपाटीकरण करून भाविकांना सुविधा जनक होवू शकेल असा प्रयत्न आयोजन समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
भाविकांसाठी सर्व सोय सुविधा
कथा स्थळी पोहचण्या अगोदरच काही अंतरावर विशाल वाहन व्यवस्था पार्किंग उभारण्यात आली आहे. तसेच भाविकांना उन, वारा, थंडी याचा त्रास होवू नये यासाठी एकूण ३ भव्य डोम मंडप उभारण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना, माता भगिनी यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. कथेस्थळी विविध ठिकाणी स्वच्छतागृहांची शौचालयांची, मुत्रालयाची व्यवस्था कार्यक्रम स्थळ परिसरात नागरिकांना सोयीस्कर होईल या पद्धतीने करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था या स्थळी उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व आवश्यक सुविधांनी सज्ज अश्या यज्ञ शाळेची उभारणी येथे करण्यात आली आहे.
जळगाव शहरासाठी संपर्क कार्यालयाची व्यवस्था
बागेश्वर बाबा यांच्या दिनांक २६ ते३० डिसेंबर दरम्यानच्या कथा कार्यक्रमासाठी शहरातील भाविकांना माहिती व सहकार्य मिळावे या दृष्टीने शहरातील खानदेश मिल शॉपिंग कॉम्प्लेक्स गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ माननीय नितीन भाऊ लढ्ढा यांच्या कार्यालयात या कथा कार्यक्रमासाठी विशेष संपर्क कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी भाविक भक्तांना योग्य ते सहकार्य मिळणार आहे.
कलश यात्रेचे उत्स्फूर्त आयोजन
परम पूज्य धीरेंद्र शास्त्रीजी महाराज यांच्या श्री हनुमंत कथा महोत्सवाचा प्रारंभ दिनांक २४ डिसेंबर रोजी भव्य दिव्य कलश यात्रेने होणार असून सकाळी८ वाजता ही भव्य कलश यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात मोठ्या संख्येने माता भगिनी, युवा वर्ग सहभागी होणार आहे.
श्री १०८ कुंडी रुद्रयाग महायज्ञाचे भव्य आयोजन, नावनोंदणीचे आवाहन
बागेश्वर बाबा सरकार परमपूज्य धीरेंद्र शास्त्रीजींच्या श्री हनुमंत कथा व दिव्य दरबारात यजमानांना संधी देऊन २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान श्री १०८ कुंडी रुद्र याग महायज्ञाचे भव्य आयोजन कार्यक्रम स्थळा लगतच करण्यात आले आहे दररोज सकाळी ७ ते दुपारी १.३० दरम्यान यजमान जोडप्यांच्या सहभागाने या ठिकाणी हा महायज्ञ सुरू राहणार असून ज्यांना या यज्ञ उत्सवात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयोजन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वयंभू चैत्यन्य राम ट्रस्ट व आयोजन समितीने केले आहे.
सहकार्यासाठी मदतीचा हात
बागेश्वर बाबा सरकार यांच्या श्री हनुमंत कथा व दिव्य दरबार कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातून सहकार्य व भरघोस प्रतिसाद लाभत आहे. शहरातील व जिल्ह्यातील विविध संस्था, मंडळ, सार्वजनिक मंडळ, यात सहभागी होणार असून या धार्मिक आयोजनाला यशस्वी करण्या दृष्टीने पाठीशी उभी राहणार आहे.
जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने मोफत औषध वितरण
कार्यक्रमस्थळी आलेले भाविक भक्तांना मोफत औषधी वितरण कक्षाचे नियोजन जळगाव जिल्हा केमीस्ट संघटनेच्या वतीने करण्यात येणार असून केमिस्ट बांधव त्या ठिकाणी ही सेवा देणार आहेत. त्या ठिकाणी आवश्यक ती वैद्यकीय मदत देणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केली आहे . या उत्स्फूर्त आयोजन यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती झुरखेडा, जळगांव शहर सेवा समितीचे परिश्रम घेत आहेत.
जळगाव शहरातील सर्व धर्म प्रेमी व दानशुर व्यापारी बंधुना विनम्र आवाहन!
जळगांव जवळील झूरखेडा येथे दिव्य व अलौकिक श्रीहनुमंतकथा व दिव्य दरबार प.पू.पंडित श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज बागेश्वरधाम यांच्या श्रीमुखाने दिनांक. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत दुपारी २ ते ५ वाजे पर्यंत होणार आहे. तसेच श्री १०८कुंडी रूद्रयाग महायज्ञचे आयोजन होत आहे ही कथा जळगांव जवळील पाळधी झूरखेडा येथे होत असुन प.पू.महाराजांचा दरबार लागणार आहे. सदरहू कथे करीता अलोटगर्दी चा महापुर होणार आहे. त्याचा लाभ आपण सर्वांना मिळणार आहे व एक अदभुत भक्तिमय सोहळा होणार आहे. सदरहू कथेत अन्नदान(भंडारा) चालू राहणार आहे यासाठी मार्केट यार्ड व औद्योगिक वसाहतीतील धर्मप्रेमी नागरिक व व्यापारी बंधूना विनंती की त्यांनी या भंडार्या साठी जास्तीत जास्त योगदान करावे. तांदूळ, गहू, दाळी , बेसन, मसाला, तेल, चहा, साखर जे आपणांस शक्य होईल ते जरुर आपण मदत करावी ही नम्र विनंती कथा समीतीने केली आहे. ज्यांना मदत करावयाचे आहे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अशोक राठी ९८२३०२९८८८, शशी बियाणी ९८२३०२७४१५, संजय शहा ८२०८२६६५११, सुनील पाटील ९८२३७९५३५५, मनोज पाटील ८७६६९१५७१८, संदीप पाटील ९९२३४२८९५३, अनिल पाटील ८३९०७१२९३३, राजू बांगर ९८२३११२५९८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.