Crime
भुसावळात बंद घरातून ६० हजारांचा ऐवज लांबविला

भुसावळ प्रतिनिधी IIबंद घर फोडून चोरट्यांनी ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना तुकाराम नगर येथे १२ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तुकाराम नगरातील स्वामी नारायण मंदीराजवळ राहणाऱ्या ६७ वर्षीय मालती चंद्रशेखर महाजन यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून चांदीचे शिक्के आणि रोकड असा ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी मालती महाजन यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. महेश चौधरी करीत आहे.