Politics
चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा
बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई
जळगाव (प्रतिनिधी) : आ. राजूमामा भोळे यांना बालदिनी दि. १४ नोव्हेंबर रोजी एका चिमुरडीने “विजयी भव” “आमचे मामा, राजूमामा” असे आशय असलेले व विजयासाठी सदिच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड भेट दिले. प्रसंगी चिमुरडीचे कौतुक करून आ. राजूमामा भोळे यांनी तिला धन्यवाद दिले.
पिंप्राळा भागातील निवृत्ती नगरातील रहिवासी आरोही निकम या ७ वर्षीय चिमुरडीने “बालदिनी” आ. राजूमामा भोळे घरी भेटीला आले असता, त्यांना शुभेच्छांपर ग्रिटींग कार्ड भेट दिले. ग्रीटिंग कार्डच्या पहिल्या पानावर “विजयी भव” व उघडल्यावर “आमचे मामा, राजूमामा” असे लिहून आरोहीने आ. भोळे यांना सदिच्छा दिल्या. प्रसंगी आरोही हिला मिठाई भरवून आ. राजूमामा भोळे यांनी बालदिनानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या.